मुंबई : ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस या ब्रिटनच्या पंतप्रधान पदी विराजमान होणार आहेत. लिझ ट्रस यांना अनेकज शुभेच्छा देत आहेत. आता याच पार्शवभूमीवर आदित्य ठाकरेंनी ट्रस यांच्या मुंबई दौऱ्यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये विशेष बाब म्हणजे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) ट्रस यांना पैठणी साडी भेट देताना दिसतायेत.
Amit Shah: “राजकारणात काहीही सहन करा, पण धोका नाही..”, अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
आदित्य ठाकरेंनी फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “पंतप्रधान निवडून आलेल्या ट्र्स यांनी पूर्वी ट्रेड सेक्रेटरी म्हणून मुंबईला भेट दिली होती. त्यानंतर त्या परत मुंबई आल्या तेव्हा परराष्ट्र सचीव म्हणून. त्यामुळेच मी त्यांच्या या दुसर्या भेटीत मी अगदी सहज उल्लेख करत त्यांना म्हटलं होतं की, मुंबई (मुंबई दौरा) तुम्हाला फायद्याची ठरली असून तुमच्या पुढील प्रवासाचं काही नवल वाटणार नाही असाच तो असेल. आज त्या यूकेच्या पंतप्रधान आहेत.”
नंतर एका ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे यांनी जुना फोटो पोस्ट केलाय या पोस्ट केलेल्या फोटोमध्ये आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर ट्रस यांना पैठणी भेट देताना दिसतायेत. हे फोटो शेअर करत आदित्य ठाकरेंनी कॅप्शन मध्ये लिहिले की, “हुजूर पक्षातील पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये विजयी झाल्याबद्दल ट्रस यांचं अभिनंदन. मला आशा आहे की त्या भारत आणि ब्रिटनमधील संबंधांना पुढे घेऊन जातील. दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवेल,” असं आदित्य म्हणाले आहेत.
Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाले…