
Rain Update | ऑगस्ट महिना संपला तरीही राज्याच्या काही भागात पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली आहे. पावसाअभावी पिके जळू लागली आहेत. येत्या काही दिवसात जर पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते, त्यामुळे शेतकरीवर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. एकीकडे राज्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातले आहे. (Latest Marathi News)
हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) राज्य आपत्ती जाहीर केली आहे. या ठिकाणी अजूनही भूस्खलन होत आहे. खबरदारीचे उपाय म्हणून सरकारने डोंगर उतारावर असणाऱ्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कुलू जिल्ह्यातील अनी भागात आज सकाळी धोकादायक आठ इमारती काही मिनिटातच जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (Heavy Rain in Himachal Pradesh)
या परिसरातील रहिवाशांना प्रशासनाने यापूर्वीच नोटीस बजावून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याशिवाय सिमल्यात आतापर्यंत २०१७ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने तब्बल १२२ वर्षाचा विक्रम मोडला आहे. या परिसरातील एकाच दिवशी पावसाने एकूण ११ जणांचा बळी घेतला आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आताच्या संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन घरे कोसळलत आहेत.