Chandrayaan 3 । भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास रचला आहे. दरम्यान, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग (Chandrayaan 3 Soft Landing) करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतर जगातील चौथा देश ठरला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग (Chandrayaan 3 Landing) करणारा हा जगातील पहिला देश बनला आहे. यानंतर अजूनही संपूर्ण देशभरात जल्लोष केला जात आहे. या यशानंतर इस्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांची काल भेट घेतली. (Latest Marathi News)
यावेळी भाषण करताना नरेंद्र मोदी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. बोलताना ते म्हणाले की, “जरी मी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होतो तरी माझं मन वैज्ञानिकांजवळ होते. या ठिकाणी येण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. अजूनही माझ्या डोळ्यांसमोर 23 ऑगस्टचा तो दिवस प्रत्येक सेकंदाला सतत फिरत आहे. भारताने 23 ऑगस्टला चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस आता ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ (National Space Day) म्हणून साजरा करण्यात येईल”, अशी घोषणा मोदींनी केली आहे.
त्याचबरोबर चंद्रावरील विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले ते ठिकाण ‘शिवशक्ती पॉइंट’ म्हणून ओळखण्यात येईल. चंद्रावरील ज्या जागेवर चांद्रयान-2 ने पाऊल टाकले आहे, त्या जागेला आता ‘तिरंगा पॉइंट’ म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा मोदींनी केली आहे. विशेष म्हणजे चांद्रयान यशस्वी झाल्यानंतर आता इस्रो ‘गगनयान’ मोहीमेची तयारी करत आहे. ही इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असणार आहे.
Political News । प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय