Dream Girl 2 । सध्या ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट चर्चेत आहे ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपट रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने दोन दिवसात एकूण 24.69 कोटींची कमाई केली आहे. (Dream Girl 2 )
राज शांडिल्य दिग्दर्शित हा चित्रपट आहे . या चित्रपटांमध्ये बॉलीवूड अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushman Khurana) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. 2019 मध्ये आलेल्या ड्रीम गर्ल चा हा सिक्वेल आहे. या चित्रपटांमध्ये आयुष्यमान खुराना आणि अनन्या पांडे यांचा कॉमेडी ड्रामा देखील पाहिला मिळत आहे. यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले आहे. (Dream Girl 2 Box office Collection)
पहिल्या दिवशी किती कमाई केली?
या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाई बद्दल बोलले तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई करत भन्नाट ओपनिंग केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 10.69 कोटींची कमाई केली आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट आयुष्यमान खुरानाच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.
हा चित्रपट फक्त 35 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता चित्रपटाने फक्त दोनच दिवसांत निम्म्याहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी आयुष्यमानच्या कामाचे कौतुक देखील केले आहे.