Tripti Desai । बारामतीत सुप्रिया सुळेंना काटें की टक्कर! तृप्ती देसाई लढणार निवडणूक, म्हणाल्या, “भाजपाने…”

In Baramati Supriya Sulena Katen ki Takkar! Tripti Desai to contest elections, says, "BJP..."

Tripti Desai । शिर्डी : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Tripti Desai) सध्या चर्चेत आल्या आहेत. यामागचं कारणही अगदी तसेच आहे. त्यांनी आता निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा! म्हणाले; “भाजपमध्ये सगळे आयाराम…

शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. तृप्ती देसाई म्हणाल्या की, मला भाजप (BJP) आणि काँग्रेसकडून (Congres) निवडणूक लढण्याबाबत विचारणा झाली आहे. परंतु जर मला भाजपकडून उमेदवारी मिळाली तर बारामतीत (Baramati) बदल घडून येईल. जरी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) महाविकास आघाडी किंवा भाजपकडून लढल्या तरी मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार, असा दावा देसाई यांनी केला आहे. (Tripti Desai vs Supriya Sule)

Ajit Pawar । सत्तेसाठी नाही तर ‘या’ कारणामुळे अजित पवार भाजपसोबत, महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचा दावा

राज्याचे राजकारण सध्या कोणत्या दिशेला चालले आहे? अजित पवारांनी भाजपची साथ दिली. तर सुप्रिया सुळे म्हणतात पक्षात फूट नाही. त्या आतापर्यंत बारामतीतून तीन वेळा खासदार झाल्या आहेत. परंतु या निवडणुकीमध्ये मला असे वाटलं होत की राष्ट्रवादीच्या एखाद्या कार्यकर्त्याला आता संधी मिळेल. आगामी निवडणुकीसाठी सुळेच तयारी करत आहेत. त्यांच्या मतदार संघात अनेक कामे रखडली आहेत, त्यामुळे त्यांचं नेतृत्व जनतेला मान्य नाही,” असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Amit Thackeray । मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक, सरकारविरोधात आजपासून जागर पदयात्रा

दरम्यान, तृप्ती देसाई यांनी यापूर्वीही आपली बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अशातच आता पुन्हा एकदाही त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता भाजप त्यांना आगामी निवडणुकीसाठी बारामतीतून त्यांना संधी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Cotton Farming । दिलासादायक! यावर्षी कापसाला मिळणार चांगले दर, जाणून घ्या यामागचं कारण

Spread the love