Maize insect । खरंतर मका (Maize) पिकाला पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगात चांगली मागणी असते. मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात मक्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी वैरणीसाठी चारापीक म्हणूून मका जनावरांना खाऊ घालतात. असे असले तरीही देशात मक्याची उत्पादकता खूप कमी झाली आहे. यामागचं कारण म्हणजे रोगराईचा प्राुदर्भाव आणि पाण्याची कमतरता होय. (Latest Marathi News)
काही दिवसांपासून या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा (American military worm) प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यावर वेळीच उपाय योजना करणे महत्त्वाचे आहे. या अळीचे तोंडावर पांढऱ्या रंगाचे उलट्या वाय आकाराचे चिन्ह दिसायला सुरुवात होते. अळीच्या पाठीवरील प्रत्येक कप्यावर ४ पांढरे ठिपके असून आठव्या किंवा नवव्या कप्प्यावर हे ठिपके असतात. खरंतर अळीच्या वाढीच्या सहा अवस्था असून उन्हाळ्यामध्ये अळी अवस्था १४ तर हिवाळ्यात ३० असतात.
Rozgar Mela । नरेंद्र मोदींच्या हस्ते 51 हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकऱ्यांची नियुक्ती पत्र
असे होते नुकसान
अंड्यातून बाहेर येताच या अळ्या पानांचा हिरवा पापुद्र खायला सुरुवात करतात. असे केल्याने पानांवर पांढरे चट्टे आढळतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानांना छिद्रे करायला सुरुवात करून पानांच्या कडा खातात. या अळ्या मक्याच्या कणसाला छिद्र करून दाणे खातात.
असे करा व्यवस्थापन
भौतिक पध्दत:
- पेरणी केल्यानंतर एकरी १० ते १२ पक्षी थांबे उभारावे.
- मका पानांवरील अंडीपुंज आणि नवजात अळ्या गोळा करून नष्ट कराव्या.
- त्याशिवाय कीड सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे लावा.
Crime News । भयानक! रमी सर्कल गेममुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर, घेतला टोकाचा निर्णय अन्….
मशागत पध्दत:
- जमिनीची उन्हाळ्याच्या दिवसात खोल नांगरट करावी.
- पीक फेर पालट करून पिकात भुईमुग किंवा सुर्यफुल पिक घ्यावे.
- हे लक्षात ठेवा की सापळा पीक म्हणून मक्याचे बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी.
- या पिकात तूर, उडीद, मुग या पिकांना आंतरपीकाची लागवड करावी.
जैविक पध्दत:
- या पिकामध्ये १५०० पी.पी.एम. अॅझाडीरॅक्टीन ५ मिली सुरवातीचे वाढीचे अवस्थेत फवारणी करणे गरजेचे आहे.
- तसेच ट्रायकोग्रामा बॅक्टरी १.५ लाख अंडी हेक्टरी सोडावे.
- जर तुम्हाला प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक मेटारायझियम रीलेई किंवा मेटारायझियम अनिसोपली ५ ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.
रासायनिक पध्दत:
- समजा पोंगा व्यवस्थित तयार होत असेल तर त्यामध्ये माती किंवा बारीक वाळू किंवा राख + चुना यांचे ९:१ या प्रमाणात त्यात टाका.
- थायोमेथोझ्याम १२.६ % सी.जी.+ लॅबडा सायहॅलोथ्रीन ९.५ % झेड. सी. (अलिका, जोश, अलर्ट, हकुरा इ.) ५ मि.लि. किवा स्पिनोटोरॅम ११.७ % एस.सी. (डेलिगेट, लारगो इ.) ४ मि.लि. किंवा क्लोरोनट्रॅनीलप्रोल १८.५ % एस.सी. ४ मि.लि. या किटकनाशकांची गरजेप्रमाणे फवारणी करणे आवश्यक आहे.
Cotton Farming । दिलासादायक! यावर्षी कापसाला मिळणार चांगले दर, जाणून घ्या यामागचं कारण