Sana Khan । भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी नागपुरामध्ये गुन्हा दाखल करून आरोपी अमित साहूला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. परंतु त्यांचा मृतदेह अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. (Sana Khan Murder)
Maize insect । ‘या’ सोप्या पद्धतीने करा मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन, होईल फायदा
मृतदेह मिळावा यासाठी आता पुन्हा एकदा पोलिसांची तीन नवी पथके जबलपूरला (Jabalpur) पाठविण्यात आली आहेत. याबाबत हिरण आणि नर्मदा नदीजवळील ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नागरिकांना मृतदेहाबाबत (Sana Khan Murder Case) विचारणा केली जाणार आहे. दरम्यान, पोलिसांना नदीजवळ एक बॅग आढळून आली होती. त्यामध्ये सना खान यांचे कपडे हाती लागले होते. (Latest Marathi News)
अमित साहूने पत्नी सना खान यांची हत्या पैशांच्या व्यवहारातून केली असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. त्याने पत्नीकडून 50 लाख रुपये पार्टनरशिपसाठी घेतले होते. सना खान यांनी हे पैसे परत मागताच त्यांच्यात टोकाचा वाद झाला. अमितने रागाच्या भरात लोखंडी रॉड सना खान यांच्या डोक्यात घातला आणि मृतदेह नदीमध्ये फेकून दिला.
Rozgar Mela । नरेंद्र मोदींच्या हस्ते 51 हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकऱ्यांची नियुक्ती पत्र