Crime News । त्याचा अपघातात मृत्यू झालाय असं सगळ्यांना वाटलं पण २ वर्षांनी चिमुरड्याने आणले आईचं घाणेरडं सत्य बाहेर

Everyone thought that he had died in an accident but after 2 years the little boy brought out the dirty truth of his mother.

Crime News । दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये (Crime) वाढ होत आहे. शुल्लक कारणावरून वाद टोकाला गेल्याच्या घटना आपण पाहत असतो. एका चुकीमुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त होते. रागाच्या भरात एखादा व्यक्ती कधी कोणता निर्णय घेईल हे सांगता येत नाही. असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. २ वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्याचे कोडे आता उलगडले आहे. (Latest Crime News)

IMD Alert । पुढील महिन्याच्या सुरूवातीला पाऊस पडणार? जाणून घ्या पुणे हवामान खात्याचा अंदाज

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 16 ऑगस्ट 2021 रोजी कंवर सिंह याचा मृतदेह गुडगाव रेल्वे स्थानकाजवळ सापडला होता. दरम्यान, कंवर सिंह यांनी त्यांच्या पत्नीला शिकवले आणि तिला नोकरी मिळाली होती. दोन मुले आणि पत्नीसह कंवर सिंह सोहना या ठिकाणी राहत होते. परंतु, नोकरीला लागताच पती-पत्नीमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली होती. या महिलेनेही पतीविरुद्ध हुंड्यासाठी मारहाण आणि छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. (Latest Marathi News)

Asia Cup 2023 । आशिया स्पर्धेपूर्वी रोहितचं मोठं विधान, म्हणाला; “पुढील दोन महिने…”

पत्नीचे ​​मथुरा येथे राहत असणाऱ्या तिच्या मेव्हण्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप कंवर सिंह यांनी केला होता. ते 14 ऑगस्ट 2021 रोजी आपल्या मुलांसह सोहाना येथे पत्नीकडे गेले असता तेथे त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांचा मृतदेह रेल्वे स्थानकावर आढळून आला होता. पतीच्या मृत्यूनंतर त्या महिलेने आपल्या दोन्ही मुलांना कंवर सिंह यांचा भाऊ संजय कुमार यांच्याकडे सोडले होते.

Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का! या पाच नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

या मुलांनी आपली आई एका तिच्या एका मित्रांसोबत राहते आणि घरी दारू पिऊन सिगारेट ओढते असे संजय कुमार यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यामध्ये त्यांनी मयताच्या पत्नी आणि प्रियकराने आपली हत्या करून मृतदेह रुळावर फेकून दिला असा आरोप केला आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Onion Rate । शेतकऱ्यांची चिंता वाढली, नाफेडकडून अजूनही कांद्याची खरेदी नाही

Spread the love