Eknath Shinde । पुणे : मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे आरक्षण (Maratha reservation) रखडले आहे. आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाकडून बऱ्याच वेळा आंदोलन करण्यात आले. परंतु अजूनही त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. अशातच सर्वोच्च न्यायलयाने (Supreme Court) देखील मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे सरकारविरोधात मराठा समाजात नाराजी पसरली आहे. (Latest Marathi News)
आता पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालेला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून 50 टक्क्यांच्या आतच आरक्षण देण्याची मागणी यावेळी मराठा समाजाच्या समन्वयकांनी केली आहे. याच पार्श्ववभूमीवर आज वर्षा बंगल्यावर आंदोलन केले जाणार होते. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या समन्वयकांशी चर्चा केली आहे.
यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत संबंधित खात्याची बैठक घेण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली. त्यावर आता राज्य सरकार दिलेले आश्वासन पूर्ण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Farmer News । मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा केविलवाणा प्रयत्न, चक्क बाटलीने पाजले पाणी