Agri News । राज्याकडे यावर्षी पावसाने पाठ (Rain in Maharashtra) फिरवली आहे. एकीकडे लावलेली पिके जगवायची कशी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एकीकडे गंभीर होत चालला आहे. 20 ते 25 दिवसापासून पावसाने (Rain) खंड दिल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. आता जरी नव्याने पेरणी करण्याची वेळ आली तरी पैसे कोठून आणायचे अशी समस्या शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. (Latest Marathi News)
Eknath Shinde । मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वपूर्ण घोषणा
राज्यावर सध्या दुष्काळाचे (Drought) संकट घोंगावत आहे. जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन चारा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने (State Govt) लवकरात लवकर ठोस पाऊले उचलावीत अशी शेतकऱ्यांमधून मागणी जोर धरू लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने मंजूर झालेल्या 1500 कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी अतिवृष्टीने नुकसानग्रस्त 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, पुढील शुक्रवार पर्यंत आणखी अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 178 कोटी 25 लाख रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Farmer News । मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा केविलवाणा प्रयत्न, चक्क बाटलीने पाजले पाणी