Ajit Pawar । भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का! १५ दिवसांतच बदलला ‘तो’ निर्णय

BJP's big blow to Ajit Pawar! 'That' decision was changed within 15 days

Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत मोठा महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अजूनही राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा नव्या चेहऱ्यांना सोबत घेऊन पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. महायुतीत सामील होऊन जवळपास दोन महिने होतील तरी अजित पवार यांना अजूनही टीकेचा सामना करावा लागत आहे. (Latest Marathi News)

Agriculture News । शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन, प्रथम येणाऱ्यास 50 हजारांचे बक्षीस

अशातच आता अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांच्याकडून भाजप नेत्याच्या कारखान्यांवर लादण्यात आलेली सर्व बंधने हटवली आहेत. दरम्यान, याबाबत भाजप (BJP) नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

Agri News । दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकरचा दिलासादायक निर्णय, ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तब्बल 210 कोटी

अजित पवारांनी १५ दिवसांपूर्वी एक जीआर काढला होता. राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC)ने मंजूर केलेले कर्ज पाहिजे असल्यास सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचे हमीपत्र द्यावे. कारखान्यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा, अशी अट घातली होती. त्यामुळे भाजप नेते नाराज झाले होते. परंतु आता हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे पवारांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Eknath Shinde । मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वपूर्ण घोषणा

Spread the love