मुंबई : राज्यातील सर्वच पक्षांनी मुंबई महापालिका निवडणुकांची जोरदार तयारदरम्यान सुरू केली आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील पक्षाला मोठेया ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. आता लवकरच राज ठाकरे 18 सप्टेंबरपासून विदर्भ (Vidarbha) दौरा करणार असून कार्यकर्त्यांनी दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. हा दौरा तब्बल सहा दिवसांचा आहे.
या दौऱ्याची तयारी सुरु झाली असून, मनसे (MNS)नेत्यांनी आज नागपूर (Nagpur) येथील तयारीचा आढावा घेतला. या दौऱ्याच्या सहा दिवसात राज ठाकरे नागपूर, चंद्रपुर आणि अमरावती येथे मुक्काम करणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे मनसे संघटनेला बळ देणे, पदाधिकाऱ्यांशी चर्चा, नविन नियुक्त्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीची तयारी या सर्वांचा आढावा घेणार आहेत.
तसेच राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात भाजप मनसे युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच या चर्चेत आणखी भर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्याचे संकेत दिले आहेत.
Suresh Raina: सुरेश रैनाने केली क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, कारण…
असा असेल राज ठाकरेंचा विदर्भ दौरा
राज ठाकरेंचा 18 सप्टेंबरपासून विदर्भ दौरा सुरू होणार असून ते 19 सप्टेंबरला नागपूरला मुक्कामी असणार आहेत.तसेच 19 सप्टेंबरला ते नागपूरमध्ये बैठका घेणार आहेत. यानंतर 20 सप्टेंबरला ते चंद्रपूर येथे मुक्काम करणार आहेत. तर 21 आणि 22 सप्टेंबरलाते अमरावती येथे आढावा बैठका बैठक घेणार आहेत अशी माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली.