
Ajit Pawar । मुंबई : ईडी (ED) सतत राज्यातील राजकीय नेत्यांवर कारवाई करत असते. कारवाईमुळे अनेक नेत्यांना तुरुंगाची हवा देखील खावी लागली आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना ईडीने खूप मोठा दिलासा दिला आहे. तसेच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देखील ईडीकडून दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्रात दाखल करण्यात आले असून यात एकूण १४ जणांचा समावेश आहे. तर या आरोप पत्रातून अजित पवार आणि त्यांच्या पत्नीचे नाव वगळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात शिंदे गटातील एका नेत्याचे नाव आहे. परंतु याप्रकरणी ईडीने प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. (ED filled chargesheet)
Rule Changes in September । सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका! आजपासून होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल
यादीत कोणाचा समावेश?
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात शरद पवार गटात असणारे प्राजक्त तनपुरे, सुभाष देशमुख, प्रसाद सागर, प्रसाद तनपुरे, रणजीत देशमुख, अलाईड अॅग्रो प्रोडक्ट, समीर मुळ्ये, तक्षशिला सिक्युरिटीज, अर्जून खोतकर यांच्या नावाचा समावेश आहे. जर या प्रकरणी कोणी आरोपी आढळले तर पुन्हा पुरवणी आरोपपत्राद्वारे त्यांच्या नावाचा समावेश करण्यात येईल, असे ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Havaman Andaj । दिलासादायक! विजांच्या कडकडाटासह पावसाचे होणार आगमन, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज