One Nation One Election । ‘वन नेशन-वन इलेक्शन’ होणार? केंद्र सरकारकडून समिती स्थापन

Will 'One Nation-One Election' be held? Committee constituted by Central Govt

One Nation One Election । नवी दिल्ली : राज्यात लवकरच निवडणुका (Elections 2023) पार पडणार आहेत. सर्व निवडणुका या डिसेंबर महिन्यातच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच संदर्भात एक मोठी समोर येत आहे. केंद्र सरकारकडून (Central Govt) 18 ते 22 सप्टेंबरला संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी हे अधिवेशन बोलावल्याने याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. (Latest Marathi News)

Political News । महाराष्ट्र हादरला! ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याने केली आत्महत्या

‘वन नेशन-वन इलेक्शन’ संदर्भात केंद्र सरकारकडून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कायद्यातील सर्व बाबींचा विचार करणार आहे. देशात मोदी सरकारची सत्ता आल्यापासून लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. तर काही राजकीय पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे.

Ajit Pawar । अजित पवारांना ED चा मोठा दिलासा! जाणून घ्या नेमकं प्रकरण

या मुद्द्यवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्याची भाजपची चाल आहे. त्यांनी वन नेशन, वन इलेक्शनचा नवा फुगा हवेत सोडला आहे. भ्रष्ट इलेक्शन कमिशन असेपर्यंत देशात वन नेशन वन इलेक्शन होणार नाही. भाजपवाले इंडियाला घाबरले असल्याचा दावा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

Devendra Fadnavis । शेतकऱ्यांना त्रास दिला तर घरी पाठवेन, देवेंद्र फडणवीसांनी दिला महावितरणच्या अधिकाऱ्यांना दम

Spread the love