Agriculture news । सोलापूर : राज्याला यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली (Rain in Maharashtra) आहे. पावसाला (Rain) पोषक अशी स्थिती तयार झाली नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाविना पिके जळू लागली आहेत. शिवाय शेतकऱ्यांना जास्त पैसे खर्च करून जनावरांना चारा विकत घ्यावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न गंभीर होत चालला आहे. (Latest Marathi News)
Pune Crime । धक्कादायक! अल्पवयीन मुलांनी केली तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कारण…
सर्वचजण चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच नर्सरी (Nursery) चालकांचे नुकसान होऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नर्सरी चालकांवर पाऊस न पडल्यामुळे परिणाम व्हायला लागला आहे. रोपे जगवण्यासाठी अनेकजण टँकर विकत घेत आहेत. परंतु त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे. खर्च जास्त आणि उत्पादन कमी निघत असल्याने नर्सरी चालक हतबल झाले आहेत.
Agri News । करोडपती व्हायचे असेल तर आजच करा ‘या’ जातीच्या शेळ्यांचे पालन, अशी करा सुरुवात
20 ते 25 लाखांचे नुकसान
दरम्यान, बार्शी तालुक्यामधील वाणेवाडी येथील सचिन लोखंडे यांनी पाच वर्षांपूर्वी नर्सरी सुरु केली आहे. प्रत्येक वर्षी त्यांना त्यातून तब्बल 20 ते 25 लाखांचे उत्पन्न निघत होते. यावर्षी पाऊस नसल्याने रोपांचा खर्च निघणे अवघड झाले आहे. यावर्षी त्यांनी 70 ते 80 हजार रोपांची लागवड केली आहे. परंतु त्यापैकी फक्त 10 ते 20 हजार रोपे शिल्लक राहिली आहेत.
बोअरवेल, विहिरींनी गाठला तळ
पावसाविना जांभूळ, सीताफळ, लिंबू, पेरु, आंबा अशी रोपे जळून खाक झाली आहेत. बोअरवेल, विहिरींनी तळ गाठला आहे. परवडत नसल्याने टँकरने पाणी देता येत नाही. त्यामुळे रोपे जगवायची कशी असा प्रश्न आता नर्सरी चालकांसमोर निर्माण झाला आहे. जर लवकर पाऊस पडला नाही तर त्यांचे आणखी नुकसान होऊ शकते.