
Uorfi Javed । मुंबई : उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी फॅशन (Uorfi Javed Fashion) आणि कपड्यांमुळे सतत चर्चेचा विषय बनत असते. तिने आतापर्यंत पोत्यापासून, दगडांपासून ते अगदी सेफ्टी पिनांपासून तयार केलेले कपडे घातले आहेत. या विचित्र फॅशनमुळे तिला खूप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली आहे. सध्या अशाच एका हटके लूकवरून चर्चेत आली आहे. अनेकांनी तिला ट्रोलही (Troll) केले आहे. (Latest Marathi News)
Adulterated milk । नागरिकांच्या जीवाशी खेळ, भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश
तिने तिच्या या अतरंगी लुकचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तिने एका कॅरीबॅगमध्ये पाणी टाकून त्यात मासे सोडले आहेत. तिने हे ‘ब्रा’सारखे तयार करून घातले आहे. या लूकचा व्हिडिओ शेअर करताना तिने ‘मछली जल की रानी है’, असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. त्यावरून तिला ट्रोल केले जात आहे. (Uorfi Javed Viral Video)
एका युजरने कमेंट करताना हे फक्त आणि फक्त उर्फी जावेदच करू शकते. तर दुसरा म्हणतो की हा जगातील आठवा अजूबा आहे. तिचा हा लूक अनेकांना आवडला नसल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, ती अनेकदा हटके लूकमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे तिला जीवे मारण्याची धमकीदेखील मिळाली आहे. परंतु या धमक्यांना ती घाबरली नाही.
खरंतर तिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केली आहे. परंतू तिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळाली आहे. सोशल मीडियावर तिला अनेकजण फॉलो करतात. त्यामुळेच तिचे शेअर केलेले प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होतात. तिचे काही लूक अनेकांना आवडत नाही.
Sharad Pawar । “शरद पवारांच्या मी अजूनही संपर्कात”, अजित पवार गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ