
मुंबई : भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतात ६० % पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. आता शेतकरी शेतीच नाहीतर शेतीला जोडधंदा म्ह्णून दुग्धव्यवसाय देखील करतात. त्यामुळे बरेच शेतकरी म्हशींचे पालन करतात. कारण म्हशींचे पालन केल्यास कमी खर्चात अधिक प्रमाणात दूध उत्पादन करण्यासाठी मदत होते.
या म्हशींचे करा पालन –
१) सुरती म्हैस
ही म्हैस मध्यम आकाराची असून तिचा रंग चांदीचा, राखाडी आणि काळा रंगाचा आहे.या म्हशीच्या दुधामध्ये 8 ते 12 टक्के फॅटचे प्रमाण आढळते. सुरती म्हशी प्रती व्यात 900 ते 1300 लिटर दुधाचे उत्पादन देते, यामुळे पशुपालकांना चांगला फायदा मिळतो.
२) मेहसाणा म्हैस
मेहसाणा म्हैस आकाराने मोठ्या असतात. काळ्या-तपकिरी रंगाच्या मेहसान म्हशीचे वजन कमी असते, पण हि म्हैस प्रती व्यात 1200 ते 1500 लीटर दूध देऊ शकते.हि म्हैस तिच्या विळ्याच्या आकाराच्या वक्र शिंगांसाठी ओळखली जाते.
३) तोडा म्हैस
तोडा म्हैस भारतामधील निलगिरी डोंगररांगांमध्ये आढळते. या म्हशीच्या दुधात 8 टक्के फॅट असते. म्हशीची दूध उत्पादन क्षमता प्रती व्यात 500 ते 600 लीटर प्रति ग्रॅम आहे.
४) चिल्का म्हैस
ही म्हैस तिच्या मध्यम आकाराची आणि काळ्या-तपकिरी रंगाने ओळखली जाते. चिल्का म्हैस प्रती व्यतामध्ये 500 ते 600 लिटर दूध देते.