
मुंबई : मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी आयकर विभागाने (Income Tax Department) महाराष्ट्रासोबत देशभरामध्ये छापेमारी केली आहे. यामध्ये दिल्ली, हरियाणा आणि गुजरातचा देखील समावेश आहे. नोंदणी असलेल्या पण मान्यता न मिळालेल्या २० पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी आयकर विभागाने कारवाई केली आहे.
दूध उत्पादन करताय? तर मग ‘या’ 4 जातींच्या म्हशी ठरत आहेत फायदेशीर? वाचा सविस्तर
देशभरात आयकर विभागाने तब्ब्ल ११० ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये महाराष्ट्रासोबत दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात,मध्य प्रदेश, हरियाणा छत्तीसगडआणि इतर काही राज्यांचा देखील समावेश आहे. या कारवाईमध्ये आयकर विभागाने पोलीस विभागाची देखील मदत घेतली.
Urfi Javed: उर्फी जावेदचा बॉयफ्रेंड कोण? यावर ती म्हणाली…
नोंदणी असलेल्या पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीबाबत आयकर विभाग अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. यामध्ये या पक्षांशी संबंधित प्रमोटर्स आणि संस्थांच्या प्रमुखांचं उत्पन्न आणि खर्च याचेही तपशील तपासले जाणारेत.