Gautami Patil Dance Show । मुंबई : काल मुंबईसह राज्यभर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला अनेकांनी मोठा प्रतिसाद दिला. राजकारणी व्यक्तींपासून ते सेलिब्रिटी व्यक्ती सर्वजण दहीहंडी उत्सवात सामील झाले होते. काहींनी या उत्सवांमध्ये डान्स देखील केले. मात्र या उत्सवामध्ये आपल्याला एक क्रेज पाहायला मिळाली ती म्हणजे गौतमी पाटील हिची. गौतमी आली तिने पाहिलं आणि तिने जिंकून घेतलं असाच कालचा माहोल होता. काल गौतमी पाटील दहीहंडी उत्सवानिमित्त पहिल्यांदाच मुंबईमध्ये दाखल झाली होती. यावेळी मुंबईकरांनी देखील तीच चांगलंच स्वागत केलं.
Covid-19 Treatment । कोरोना झाला, औषध घेतलं अन् बाळासोबत घडलं भलतंच; घटना वाचून येईल अंगावर काटा
यामध्ये गौतमी पाटीलची क्रेज फक्त गावापुरतीच मर्यादित नसून मुंबईसारख्या मोठ्या शहरातही गौतमीची क्रेज कायम असल्याचे दिसून आल आहे. मात्र आपल्याला तर माहीतच आहे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे समीकरण काही नवीन नाही. ते ठरलेलेच आहे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात कायमच राडा होतो. सध्या देखील काल दहीहंडी उत्सवात गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
खरीप हंगाम जून 2022 च्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तहसीलदार यांना निवेदन
गौतमीचा डान्स करत असताना एक तरुण स्टेजवर चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याला पब्लिकने अडवले मात्र तो ऐकायला तयार नव्हता तो स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिथं उपस्थित असलेल्या पब्लिकने त्याला त्याच ठिकाणी चांगला चोप दिला आहे. त्यामुळे काही वेळ कार्यक्रमामधील वातावरण देखील तंग झालं होतं. मात्र तेवढ्यात पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप करत त्या तरुणाला कार्यक्रमातून बाहेर काढलं आणि पुढील कार्यक्रम सुरू झाला.
Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत केली मोठी घोषणा; आता कुणबी प्रमाणपत्र…