Mumbai Rain । सप्टेंबर महिना सुरू होताच पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज काहीसा खरा ठरताना दिसतोय मागच्या काही दिवसापासून पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून काही ठिकाणी हलक्या प्रमाणात पाऊस पडत आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे. (Mumbai Rain )
Manoj Jarange। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला हात जोडून केली ‘ही’ विनंती; म्हणाले, तुम्ही जर…”
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस मुंबईमध्ये होईल त्याचबरोबर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाचा जोर असाच कायम राहिला तर काही वेळातच सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान ठाण्याकडून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल दहा ते पंधरा मिनिटांनी उशिरा धावत आहेत. पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरगाव, मालाड, जोगेश्वरी, बोरिवली, दहिसर, कांदिवली, विलेपार्ले, वांद्रे, सांताक्रुज, परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झालेली आहे.
मुंबईचा अंधेरीचा भाग हा सखल भाग असल्यामुळे सबवे खाली पाणी भरले असून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागत आहे.