Congress । काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केला शिंदे गटामध्ये प्रवेश

Big blow to Congress! 'These' big leaders entered the Shinde group

Congress । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यांमध्ये नवीन सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. यानंतर शिंदे गटात इन्कमिंग सुरू झालं असून ठाकरे गटाला चांगलीच गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान ठाकरे गटापाठोपाठ आता काँग्रेसला देखील मोठं खिंडार पडल्याच समोर आले आहे. महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटांमध्ये प्रवेश करत आहेत आता. महाराष्ट्रानंतर राजस्थान मध्ये देखील शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा खिंडार पडल्याची माहिती समोर आली आहे.

Maharstra Rain Update । मोठी बातमी! गोदावरी नदीला धडकी भरवणारा पूर; मंदिरे, घरे गेली पाण्याखाली…

राजस्थान मधील काँग्रेसचा बडा नेता आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळचे सहकारी राजेंद्र गुडा (Rajendra Guda) यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती त्यांनी हा प्रवेश केला आहे. सध्या आगामी निवडणुकांचे वारे वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राजेंद्र गुडा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याच्या चर्चा सुरू आहेत.

G-20 summit । इंडिया नाही भारतच! G20 परिषदेत नरेंद्र मोदींच्या समोरील फलकावरून चर्चा

राजेंद्र गुडा यांच्या प्रवेशाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे राजस्थानच्या झुनझुनमध्ये गेले होते. यावेळी राजेंद्र गुडा यांनी कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आणि शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे देखील बोलले जात आहे.

“जरांगे पाटील यांच आम्हाला घेणं देणं नाही, कुणबी समाजाच्या अस्मितेला हात लावला तर भयंकर उत्तर देऊ”, काँग्रेसच्या नेत्याच वक्तव्य

Spread the love