Farmer Suicide । औरंगाबाद : पावसाने यंदा चांगलीच दडी (Rain in Maharashtra) मारली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी (Rain) पिके करपू लागली आहेत. शेतकऱ्यांना जास्त किमतीने जनावरांना चारा विकत घ्यावा लागत आहे. दुबार पेरणीचीही वेळ निघून गेली आहे. अशातच राज्यात मान्सून (Maharashtra Rain) सक्रिय झाला आहे. जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. (Latest Marathi News)
दरम्यान, शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. मराठवाड्यात (Marathwada) गेल्या चार वर्षांपासून जास्त पाऊस पडत आहे, परंतु यंदा मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. संकटात सापडलेला शेतकरीवर्ग आता टोकाचा निर्णय घेऊ लागला आहे. मागील आठ महिन्यात एकूण 865 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. दररोज दोन ते तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत.
Tulsi Plant । रविवारच्या दिवशी तुळशीची पाने का तोडू नये? जाणून घ्या यामागचं मोठं कारण
कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आकडा
सर्वात धक्कदायक बाब म्हणजे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड (Beed) जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत परंतु त्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत नाही. कर्ज, नापिकी यांसारख्या वेगवेगळ्या कारणांवरून शेतकरी आत्महत्या करत आहेत. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
मागील आठ महिन्यातील आकडेवारी
औरंगाबाद जिल्ह्यात मागील आठ महिन्यात एकूण 95 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर जालना जिल्ह्यात 50, हिंगोली जिल्ह्यात 22 शेतकरी, परभणीत 58, लातूरमध्ये 51 तसेच नांदेडमध्ये एकूण 110 आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 113 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. तर बीड जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 186 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.