मुंबई : राज्यात काल ( बुधवारी) अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (heavy rain)झाला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील पाच दिवस आणखी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान हवामान विभागाकडून (Meteorological Department) राज्यातील १४ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट (Yellow alert)देण्यात आला आहे. राज्यातील पुणे,नाशिक, सातारा, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यांमधील काही भागात पावसामुळे ढगफुटी झाली आहे. दरम्यान या पावसामुळे नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी घेतले अभिनेते नाना पाटेकरांच्या घरच्या गणपतीचं दर्शन
नुकसानीचे पंचनामे तातडीने करा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीसंदर्भात माहिती जाणून घेतली. दरम्यान याच पार्शवभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांकडून ज्या ज्या गावांमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर तातडीने मदत पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले आहेत की, मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घ्यावी.
शेतकरी मित्रांनो! शेतीच्या बांधावर निवडुंगाची लागवड करा आणि कमवा लाखो रुपये
प्रवाशांचे झाले हाल
काल पावसामुळे राजधानी मुंबई, ठाण्यालाही जोरदार तडाखा दिला. या भागातील रस्ते वाहतूक मंदावली आणि कामावरुन घरी परणाऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे हाल झाले.तसेच कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरातही जोरदार पावसामुळे गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला.ठाणे जिल्ह्यात पातलीपाडा, खारेगाव आणि कोपरी या तीन ठिकाणी जोरदार पावसामुळे मोठ मोठी झाडे मुळांसह पडली.