Ajit Pawar । पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पाडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सरकारमध्ये सहभागी होतच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे अर्थखातेही देण्यात आले आहे. परंतु विरोधी पक्षाकडून सतत अजित पवार मुख्यमंत्री (CM) होणार असल्याचा दावा केला जात आहे. आता अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
Farmer Suicide । भयानक! दररोज 3 शेतकरी करतायत आत्महत्या, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आकडा
पुण्यात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले की, “भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावून काहीच फायदा नाही. जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर १४५ ची मॅजिक फिगर गाठावी लागते. ही वेळ कधी येईल माहिती नाही. आपण आपले काम करावे”, असे सांगत अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. (Ajit Pawar Pune)
Breaking News | कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात केली आत्महत्या
पुणे शहरात यापूर्वीही अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले होते. अशातच आता त्यांचे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘हक्क मागून मिळत नाही, हक्कासाठी लढावं लागत. महाराष्ट्राचे लाडके दादा. पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत,’ अशी बॅनरबाजी केली आहे. सध्या या बॅनरची चर्चा रंगली आहे.