मुंबई : सारा अली खान ही बॉलिवूडच्या खान फॅमिली मधील सैफ अली खानची मुलगी आहे. अतिशय कमी वयात साराने (Sara ali Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तसेच तिने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये (Bollywood) तिची एक वेगळीच छवी निर्माण केली आहे. साराचा स्वभाव हा मनमिळावू आणि एकदम बडबडा आहे. तिच्या या स्वभावामुळे आणि अभिनयामुळे गेल्या काही वर्षांमध्ये साराच्या फॅन (fans)फाॅलोइंगमध्येही वाढ झालीयं. सारा नेहमी सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असते. नेहमी चाहत्यांसाठी विविध प्रकारचे फोटो (Photo) सारा शेअर करते. यामुळे ती नेहमी चर्चेत असते.
‘या’ पद्धतीने करा कोंबडखताचा वापर, पीक येईल जोमात; वाचा सविस्तर
दरम्यान साराने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक नवीन मजेदार व्हिडीओ (video)शेअर केलायं. ज्यामध्ये ती जया बच्चन यांच्या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. या व्हिडिओमध्ये साराने दोन गाण्यावर जबरदस्त डान्स केलायं. विशेष म्हणजे चाहत्यांना देखील साराचा हा खास व्हिडीओ (Video) खूप आवडला आहे. साराचा हा खास डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं.
स्टुडिओमध्ये पहिल्यांदा साराने तिच्या हेअरस्टायलिस्टसोबत ‘बाहों में चले आओ’ गाण्यावर डान्स करत रोमान्स केला. तर दुसऱ्या गाण्यावर म्हणजेच पल पल न माने टिंकू जिया या गाण्यावर साराने जबरदस्त डान्स केलायं. हा व्हिडीओ शेअर करताना सारा अली खानने ‘अपीयरेंस vs अॅपिरियन्स अॅक्यूरेट व्हर्जन’ अशी कॅप्शन दिली आहे. खरतर पल पल न माने टिंकू जिया गाण्यावरील साराचा डान्स बघितल्यावर कोणीही स्वत: हसण्याशिवाय रोखू शकत नाहीयं.
शेतकरी मित्रांनो! शेतीच्या बांधावर निवडुंगाची लागवड करा आणि कमवा लाखो रुपये
या व्हिडिओवर यूजर्स अनेक प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ही मुलगी वेडी झालीयं.अनेकांनी साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्या पेजवर शेअर केलायं. काही दिवसांपूर्वी सारा अली खान अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’मध्ये दिसली होती. दरम्यान लोकांना साराचा हा चित्रपटही आवडला होता.