Ajit Pawar । पुणे : शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पक्षात फूट पडल्यापासून शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार या दोन्ही गटांनी पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षावर दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रलंबित आहे. निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
Aurangabad Crime । माजी उपसभापतीच्याच लॉजवर सुरु होता नको तो प्रकार, पोलिसांनी धाड टाकली आणि…
अशातच अजित पवार गटाला ट्विटरकडून (Twitter) मोठा धक्का बसला आहे. ट्विटरने अजित पवार गटाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले आहे. ट्विटरचे नियम न पाळल्यामुळे कारवाई केली आहे. पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रिय झाले आहेत. प्रत्येक सभेची, पत्रकार परिषदेची तसेच इतर माहिती यावर टाकली जात आहे. (Twitter suspended Ajit Pawar faction account)
Gold Silver Price Today । ग्राहकांनो चला खरेदीला! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार सोने-चांदी
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने NCPspeaks_official या नावाने नवीन ट्विटर अकाऊंट सुरु केले होते. परंतु मागील दोन दिवसांपासून ते सस्पेंड केले आहे. त्यानंतर अजित पवार गटाने लगेचच ट्विटरला मेल केला आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सक्रिय होईल, अशी अजितदादा गटाला आशा आहे.