Ambadas Danve: याकूब मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण हे खूपच दुर्दैवी, अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया

Exhumation of Yakub Memon's grave is very unfortunate, Ambadas Danve reacted

मुंबई : मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट (mumbai bombsfot)मालिकेतील दोषी दहशतवादी याकूब मेमनच्या (yakub meman) कबरीचे उद्दातीकारण या प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्रातल वातावरण तापले आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दानवे म्हणाले की याकूब मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण हे दुर्दैवी आहे. कोणाच्या काळात झाले किंवा कोणी माफी मागावी हे व्यर्थ आहे.

Amit Shaha: मुंबईत दौऱ्यावेळी अमित शहांच्या सुरक्षेत ‘ही’ मोठी चूक, धक्कादायक कारण आल समोर

दहशतवादी याकूबच्या कबरीवर सोन्याचा मुलामा देणे हे निषेधार्थ आहे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (chandrakant Bavankule) यांनी याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाला मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सध्या सोशल मीडियावर मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करून त्याभोवती मार्बलने सजवून त्याला लायटिंग करून त्यावर फुलांचा वर्षाव केल्याचा फोटो व्हायरल होत आहे.

Sara Ali Khan: चक्क हेअरस्टायलिस्टसोबत सारा अली खानने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून येईल हसू

हेच का ठाकरेंचे मुंबईवरील प्रेम आणि देशभक्ती?

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि आमदार राम कदम यांनी यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. यावेळी राम कदम म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या काळात याकूबच्या कबरीचे मझारमध्ये रुपांतर झाले. हेच आहे का उद्धव ठाकरेंचे मुंबईवरील प्रेम आणि देशभक्ती? तसेच राम कदम यांनी शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या जनतेची माफी मागावी असे ट्विट केले आहे.

‘या’ पद्धतीने करा कोंबडखताचा वापर, पीक येईल जोमात; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *