Anil Parab । “…त्यामुळे भाजपने राष्ट्रवादी फोडली”, अनिल परब यांच्या दाव्याने खळबळ

that's why BJP broke the NCP", Anil Parab's claim sparked a stir

Anil Parab । पंढरपूर : आधी शिवसेना (Shivsena) मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खूप मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारपासून शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु होणार असून संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमागे भाजपचा (BJP) हात असल्याचा आरोप सतत विरोधांकडून केला जात आहे. (Politics News)

Eknath Shinde । “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं”, त्या व्हायरल व्हिडिओवर एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ” काही लोक खोडसळपणे..”

अशातच आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पक्षफुटीबाबत एक मोठा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांसकट 16 आमदार अपात्र ठरणार असून सत्ता सरकार वाचवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आहे. हे सरकार फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे,” असा गंभीर आरोप अनिल परब यांनी पंढरपूरमध्ये केला आहे.

Crime News । शिक्षकाने लावली विद्यार्थ्यांच्या कानाखाली अन् विद्यार्थी पोहचला थेट ऑपरेशन टेबलवर; नेमकं शाळेत काय घडलं?

तसेच त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केले आहे. “सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार नसून त्यासाठी योग्य इम्परिकल डाटा मागास आयोगाने द्यावा. मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला वंशावळ न पाहता सरसकट कुणबी दाखले मिळावे,” अशी मागणी परब यांनी केली आहे.

Politics News । इंडिया आघाडीला मोठा धक्का? समन्वय समितीच्या पहिल्याच बैठकीला ‘या’ पक्षाने मारली दांडी

Spread the love