
Elvish Yadav । बिग बॉस ओटीटी २ च्या दुसऱ्या सिझनमध्ये सोशल मीडिया स्टार आणि प्रसिद्ध युटूबर एल्विश यादवने विजेतेपद जिंकले. यानंतर तो सातत्याने चर्चेत राहिला. त्याच्या चाहत्यांमध्ये देखील प्रचंड वाढ झाली. त्याला म्युझिक व्हिडिओ पासून ते चित्रपटांमध्ये ऑफर्स येऊ लागल्या. नुकतच त्याने अभिनेत्री उर्वशी रौताला सोबत एक म्युझिक व्हिडिओ शूट केला आहे. दरम्यान त्याने आता दुबईमध्ये स्वतःच एक घर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
एल्विश यादव २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त त्याने दुबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. याबाबत त्याने त्याच्या यूट्यूब चैनलवर व्लॉग शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने दुबईतील त्याचे घर दाखवले आहे. त्याच्या घराची किंमत जवळपास ८ कोटी रुपये आहे. मात्र याबाबत एल्विशने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. (Elvish Yadav)
Maharashtra Politics । शिंदे गट की ठाकरे गट कोणाचे आमदार अपात्र ठरणार? आज होणार सुनावणी
एल्विशने युट्युब वर टाकलेल्या व्लॉगमध्ये एल्विशच्या घरातील प्रत्येक कोपरा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दुबई मधील त्याचे घर खूपच सुंदर आणि आलिशान असल्याच पाहायला मिळत आहे. दरम्यान एल्विश त्याचा 26 वा वाढदिवस साजरा करत असून त्या निमित्त सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याच्यावर जोरदार शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे.