YouTube: जाहिरातीशिवाय युट्यूब व्हिडिओ पहायचेत, मग आजच करा ‘हे’ ॲप इंस्टॉल

Want to watch YouTube videos without ads, then install this app today

मुंबई : जगभरात YouTubeच्या प्लॅटफॉर्मवर असंख्य युझर्स आहेत. सध्याच्या काळात युट्यूबचा (YouTube) वापर वेगवेगळी कौशल्य शिकण्यासाठी आणि इतरांना शिकवण्यासाठी केला जात आहे. युट्यूबच्या माध्यमातून अनेकांनी मोठी झेप घेतली आहे. यात स्वत:चे युट्यूब चॅनेल चालवणारे युट्यूबर्स तर आहेत. पण त्याचबरोबर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे.

Kishori Pednekar: दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीशी शिवसेनेचा काडीमात्र संबंध नाही, किशोरी पेडणेकरांचा विरोधकांवर पलटवार

ज्यावेळी वापरकर्ते युट्यूबवर व्हिडीओ पाहत असतात त्यावेळी अचानक मध्येच जाहिराती आल्यानंतर लोकांचा हिरमोड होत असतो. त्यामुळं व्हिडिओतून मिळणारी माहिती मिळायची तर राहतेच पण याशिवाय वापरकर्त्यांची वेळही वाया जातो. पण आता युट्यूबकडून एक महत्वाचा पर्याय यासमोर आला आहे. तो म्हणजे जर तुम्हाला जाहिराती शिवाय युट्यूब व्हिडीओ बघायचे असतील तर तुम्हाला आता पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

आता वर्षभर टिकवता येणार फळांचा राजा हापूस आंबा, अशी आहे प्रक्रिया…

कारण यासाठी युट्यूबकडून ‘YouTube Vanced’ हे अतिशय लोकप्रिय ॲप आहे. याच्या मदतीने वापरकर्ते जाहिराती शिवाय युट्यूब व्हिडिओ पाहू शकतात. यामध्ये कोणतेही सबस्क्रिप्शनचे पैसे तुम्हाला भरावे लागणार नाही. जगभरात लाखो लोक हे ॲप वापरतात. पण, गुगलकडून ‘YouTube Vanced’ ही सेवा बंद करावी अशी कायदेशीर नोटीस देण्यात आली होती. तरीही तुम्हाला थर्ड पार्टी साइटवरून हे ॲप इंस्टॉल करता येईल. हे ॲप फक्त अँड्रॉइड फोनसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *