
Rakhi Sawant | अभिनेत्री राखी सावंत हिला बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखले जाते. राखी सावंत सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरील तिच्या व्हिडिओमुळे आणि फोटोमुळे राखी कायम चर्चेत असते. मात्र मागच्या काही दिवसापासून राखी तिच्या खाजगी आयुष्याबद्दल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
Anju Verma । प्रेमापोटी पाकिस्तानात गेलेली अंजू परतणार मायदेशात, महत्त्वाचं कारण आलं समोर
राखीने पती आदिल खान याच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे तिचा पती आदिल खान याला तुरुंगात जावं लागलं त्यानंतर आदिल तुरुंगातून बाहेर येताच त्याने देखील राखी वर गंभीर आरोप केले होते. मात्र आता राखीने घडलेल्या घटना सांगत खाजगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
सध्या राखीने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये आदिल राखीला म्हणतोय माझ्यासाठी एक गाणं तयार कर.. मला बिग बॉस नाहीतर लॉक ऑफ मध्ये जायचंय… यावर उत्तर देत राखी ओके डिअर म्हंटली आहे. राखीने पोस्ट केलेला स्क्रीनशॉट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
स्क्रीनशॉट शेअर करत राखीने कॅप्शनमध्ये लिहिले की, मला माहिती होतं त्याला बिग बॉस मध्ये यायचंय… त्याने फक्त प्रसिद्धीसाठी माझा वापर केला आहे .. त्याने माझी फसवणूक केली… असं राखी म्हणाली आहे. सध्या राखीच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेक वेगवेगळ्या कमेंट राखीचे चाहते करत आहेत.