Ajit Pawar: “बारामतीत माझे काम बोलते”, अजित पवारांचा विरोधकांच्या बारामती दौऱ्यावरून घणाघात

"My work speaks in Baramati", Ajit Pawar's attack on opposition's Baramati tour

मुंबई : भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी बारामतीमध्ये भाजपचा (bjp) झेंडा फडकवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली असून इथे भाजपाचाच विजय होणार, अशी घोषणा केली होती. दरम्यान यावर अजित पवारांनी आज बारामतीत (Baramati) अखिल मंडई गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूकप्रसंगी बोलताना विरोधकांना सणसणीत टोला लगावत उत्तर दिले आहे.

अजित पवार म्हणाले की, “असे कितीतरी जण आले आणि गेले 55 वर्षांत. पण बारामतीकरांना (Baramati) माहिती आहे, कुणाचे बटण दाबायचे ते, असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपाला लगावला आहे. पुढे अजित पवार म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव सगळ्यांनी अतिशय आनंदाने, चांगल्या प्रकारे पार पाडला कारण मागच्या वर्षी कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करता येत नव्हता. अखिल मंडईपासून सुरू होणाऱ्या मिरवणुकीत आम्ही सहभागी होणार आहोत.तसेच सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Ajit Pawar: मतदानावेळी कुठं बटण दाबायचं हे बारामतीकरांना माहितीये, अजित पवारांचा विरोधकांवर पलटवार

आमकं साकडं घातलं, तमकं साकडं घातलं

दर्शनाला जायचे तर मनमोकळेपणाने जावे. प्रत्येकवेळा बाप्पाकडे मागणेच मागावे असे काही नाही.पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो किंवा इतर कोणत्या दर्शनाला गेलो, की आमकं साकडं घातलं, तमकं साकडं घातलं, हे असले मला आवडत नाही.सारखे साकडे घालून कशाला अडचणीत आणायचे, अशी टीका देखील अजित पवारांनी केली आहे.

Raktchandan: रक्तचंदनाला आंतरराषट्रीय बाजारात लाखोंची मागणी, रक्तचंदनाचा ‘हा’ आहे औषधी उपयोग

बारामतीत माझं काम बोलत..

माझ्यापेक्षा जास्त काम जर कुणी बारामतीत काम करत असेल तर त्याचा विचार करता येईल.कावळ्याच्या शापाने जनावरं मरत नाहीत.ही वस्तुस्थिती आहे. बारामतीत माझं काम बोलत त्यामुळे बारामतीत कुणीही येऊ द्या. त्यांचं स्वागतच आहे. पण मतदानाच्या दिवशी कुठं बटण दाबायचं हे बारामतीकरांना (Baramati ) चांगलंच ठाऊक आहे.

…म्हणून प्रसिद्धी मिळाली

चंद्रकांत बावनकुळे प्रसिद्धीसाठी बारामतीला येतात.बारामतीला आले नसते तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. ते इथे आले म्हणून प्रसिद्धी मिळाली.तुम्ही इतके संघटनेमध्ये इतके सक्रिय होतात, मग पक्षाने तुम्हाला, तुमच्या पत्नीला उमेदवारी का नाकारली याचे उत्तर द्या, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना अजित पवार यांनी केला आहे.

Neeraj Chopra: नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास, डायमंड ट्रॉफी जिंकणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *