
Gopichand Padalkar । इंदापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सतत पवार (Pawar) घराण्यावर निशाणा साधत असतात. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर लबाड लांडग्याचं पिल्लू अशी खोचक शब्दात टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर अजित पवार समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात ‘जोडेमारो’ आंदोलन केले जात आहे. (Latest Politics News)
पुणे (Pune) जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातही याचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. पडळकरांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत भवानीनगर येथे कॅनॉलमध्ये त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जलसमाधी देण्यात आली. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पडळकरांना त्यांचे वक्तव्य चांगलेच भोवले आहे.
भाजपचा माफीनामा
पडळकरांच्या वक्तव्यावरून दिवसेंदिवस राजकीय वातावरण चिघळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून अजित पवारांची जाहीरपणे माफी मागण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांची जाहीर माफी मागितली आहे. तसेच या विषयाबाबत आपण गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
NCP । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ पाच आमदारांविरोधात कार्यवाही सुरु