Pune News । पुणे : अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाला (Rain in Maharashtra) अखेर सुरुवात झाली आहे. ज्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे. सर्वांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. संपूर्ण राज्यभरात पावसाचा अलर्ट (Rain Alert) जारी करण्यात आला आहे. काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. (Rain in Pune)
Nagpur Flood । नागपूरमध्ये 10 हजार घरांत पाणीच पाणी, नुकसानग्रस्तांना मिळणार 50 हजारांची मदत
परंतु येथे दरड (Landslide) कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पुण्यातील खानापूर -रांजणे पाबे घाटात घाटमाथ्यावरील पावसामुळे दरडी कोसळू लागल्या आहेत. दरम्यान, राजगड,सिंहगड,तोरणा गड आणि वेल्हे पानशेत भाग पाबे घाटामुळे जोडला आहे. शुक्रवारी येथे दरड कोसळली होती, परंतु पुन्हा एकदा शनिवारी येथे दरड कोसळली (Crack collapsed) होती. त्यामुळे घाट रस्त्यावरील प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबी मशीनच्या साह्याने मलवा हटवण्याचे काम सुरु करण्यात आले असून या भागातील रुंदीकरण करण्यासाठी दोन्ही बाजूचे डोंगर तोडले असल्याने दोन वर्षांपासून दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
Sanjay Datt । नशेमध्ये थेट सेटवर गेला अन् संजय दत्तने अभिनेत्री सोबत केले धक्कादायक कृत्य!