Ganesh Festival । काय सांगता? गणेश मूर्तीच्या डोळ्यात अश्रू, भाविकांची प्रचंड गर्दी

Tears in the eyes of Ganesha idol, huge crowd of devotees

Ganesh Festival । फक्त देशातच नाही तर विदेशातही गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करतात. अबालवृद्धांचे लाडके दैवत असणाऱ्या बाप्पाच्या आगमनाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. काही जण दीड, तीन, पाच किंवा सातव्या दिवशी लाडक्या गणरायाचे विसर्जन करतात. तर काही जण अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) दिवशी विसर्जन करतात. अशातच एक चकित करणारी माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांना नागपूरमध्ये संतप्त नागरिकांनी घातला घेराव

गणेश मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याची बातमी सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिंचोली येथे घडली आहे. ही माहिती मिळताच भाविकांची एकच गर्दी उसळली आहे. चिंचोली गावातील बापू जाधव यांच्या घरी ही घटना घडली आहे. त्यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मात्र पूजा करत असताना त्यांना बाप्पाच्या डोळ्यात चमक पाहायला मिळाली.

Ajit Pawar । शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांच्या ‘त्या’ फोटोवर अजित पवार म्हणाले, “मला त्याबद्दल..”

दरम्यान, ही चमक म्हणजे बाप्पाचे अश्रूच आहे असा समज झाला. कापसाच्या बोळ्याने डोळे टिपले. जमलेल्या लोकांनीही याला दुजोरा दिल्याने गणपतीच्या डोळ्यात अश्रू आल्याची अफवा पसरली. अनेकांनी दर्शनासाठी गर्दी केली. परंतु हे प्रकाशाच्या परार्तनाचा प्रकार आहे स्पष्ट झाले. त्यामुळे अंनिसकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

Ganesh Chaturthi 2023 । अनंत चतुर्दशी दिवशी ‘या’ शुभ मुहूर्तावर करा लाडक्या गणरायाचे विसर्जन

Spread the love