Maharashtra Politics । मुंबई : मागील वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षात बंड करून भारतीय जनता पक्षासोबत (BJP) युती करून सरकार स्थापन केले. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खूप मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना शिवसेनेने अपात्रतेची नोटीस बजावली होती. या प्रकरणाचा अजूनही निकाल लागला नाही. (Latest Marathi News)
Onion Rate । कांद्याला येणार अच्छे दिन? दिल्लीत होणार महत्त्वाची बैठक
ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा डाव आता शिंदे गट आखू लागला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या ४ खासदारांना शिंदे गट नोटीस पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरु करत आहे. संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी मतदानही घेण्यात आलं. त्यावेळी या ठाकरे गटाचे चार खासदार गैरहजर होते.
Kangana Ranaut । कंगनाची होणार राजकारणात एन्ट्री? म्हणाली; “आगामी निवडणुकीत भगवा रंग…”
याप्रकरणी शिंदे गट आता आक्रमक झाला आहे. लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी यांनी व्हिप काढला होता. त्यात विधेयकाच्या बाजूने खासदारांनी मतदान करावे, असं सांगण्यात आलं होतं. तरीही राजन विचारे, विनायक राऊत, ओमप्रकाश निंबाळकर आणि संजय जाधव हे खासदार त्यावेळी हजर नव्हते. त्यांना लवकरच एक नोटीस पाठवली जाणार आहे. याला आता ठाकरे गट कशाप्रकारे उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Fire Accident । हृदयद्रावक! लग्न समारंभात लागलेल्या आगीमध्ये १०० जणांचा मृत्यू तर १५० जण जखमी