
मुंबई : आपल्याला रोज वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतय. त्यातली त्यात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात
सर्दी (cold) आणि खोकला (Cough) या दोन्ही आरोग्याच्या समस्या या जास्त प्रमाणात उद्भवतात. त्यामुळे याचा आपल्या रोजच्या कामावर विपरीत परिणाम होतो. सर्दी खोकल्याचा परिणाम घशावर (throat) देखील होतो कधी कधी घशामध्ये एलर्जी देखील होते. जरी सर्दी खोकल्यासाठी कुठले औषध घेतले तर त्याचा ताबडतोब फरक पडत नाही. त्यामुळे काही घरगुती छोटेसे उपाय जाणून घेऊ.
Pune: पुण्यात गणेश विसर्जनासाठी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे आले समोरासमोर, नेमक घडलं तरी काय?
1)मध – सर्दी,घसा दुखी किंवा खोकला या अजनापासून आराम मिळण्यास मधाची मदत होते. कारण मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात. सर्दी खोकला मध्ये घसा खवखवतो यावर मधामुळे आराम मिळतो.
2) कोमट पाणी- जर सर्दी खोकला झाल्यावर सतत कोमट पाणी प्या. कोमट पाणी प्यायल्यामुळे गळ्याच्या सभोवती जी काही सूज असते ती देखील कमी होते आणि यातून घशाला आराम मिळतो. तसेच कोमट पाणी पिल्यावर सर्दी खोकल्याचा संसर्ग हळूहळू कमी होण्यास मदत होते.
‘अशी’ घ्या गाभण शेळ्यांची काळजी, होईल फायदा…
3) आले- आल्याचा चहा सर्दी खोकला झाल्यावर पिल्याने घशाला आराम मिळतो. सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिल्यास नाकातून पाणी येणे आणि नाक बंद होते.
4) हळद- हळदीमध्ये अँटीसेप्टीक आणि अँटिबायोटिक घटक असतात हे आपल्याला माहीत आहे.पण जर सर्दी मुळे होणारी जळजळ आणि वेदना हळदीमुळे कमी होतात.झोपण्याच्या आधी जर तुम्ही एक ग्लास गरम दुधात हळद टाकून पिले तर सर्दी आणि खोकला बरा होतो.
राज्यात हजारो जनावरांना लम्पी आजाराची लागण, पशुवैद्यक झाले सतर्क