Pankaja Munde । मुंबई : सध्या मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्याने घर नाकारल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मराठी म्हणून असल्याने घर नाकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे प्रकरण ताजे असताना आता भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनीही आपल्याला केवळ मराठी म्हणून घर नाकारलं होतं, अशी धक्कादायक माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
Sharad Pawar News । रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई, शरद पवारांनी सोडले मौन, म्हणाले…
“आज एका मराठी मुलीची व्यथा मी पाहिली. मला खरंतर भाषा आणि प्रांतवादात पडायला आवडत नाही. परंतु एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर (House) देत नाही हे सांगताना तिच्यावर प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे. कारण ज्यावेळी माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं, त्यावेळी हा अनुभव मलाही आला आहे”, असे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.
“माझ्यासारख्या व्यक्तीला देखील याचा अनुभव आला हे खूप म्हणजे खूप दुर्दैवी बाब आहे. खरंतर देशांच्या प्रत्येक राज्यांमध्ये प्रत्येक भाषेच्या प्रत्येक दुसऱ्या राज्याच्या, कोणत्याही जातीच्या लोकांना घर देण्यासाठी एखाद्या परवानगीची गरज काय आहे? हा माझा प्रश्न आहे. माझी भूमिका कोणी एकासाठी नाही परंतु ही भूमिका सर्वांनी एक व्हावं यासाठी आहे,” असेही पंकजा मुंडें म्हणाल्या आहेत.
Vishal Bribe Case । “माझे पैसे वाया गेले”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली एकनाथ शिंदेंकडे तक्रार