World Cup 2023 । दोन दिवसात 3 सामने रद्द झाल्यानं वर्ल्डकप सामन्यांच टेन्शन वाढलं

The tension of the World Cup matches increased as 3 matches were canceled in two days

World Cup 2023 । नवी दिल्ली : 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप (World Cup) सामान्यांना सुरवात होणार आहे. सर्वच संघ या सामन्यांसाठी सज्ज झाले आहेत. चाहत्यांसह संपूर्ण क्रिकेट जगताचे या सामन्यांकडे लक्ष लागले आहे. परंतु या सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं आहे. कारण पावसाने पुन्हा राडा घातला आहे. पावसामुळे दोन दिवसात 3 सामने रद्द झाले आहेत. आशिया कपमध्ये (Asia Cup) जे घडलं तेच वर्ल्डकपमध्ये ((World Cup Match) घडू शकते का? असा सवाल निर्माण होत आहे. (Latest Marathi News)

Supriya Sule । सुप्रिया सुळेंना भाजपाचा इशारा, म्हणाले; “खोलात गेलो तर अवघड जाईल…”

सध्या वर्ल्ड कपची वॉर्म अप मॅच सुरू असून या मॅचमध्ये पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. वॉर्म अप मॅच (World cup warm up match) दरम्यान पाऊस आल्याने अवघ्या दोन दिवसात तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. आशिया कप सामन्यातही (Asia Cup 2023) पावसाने थैमान घातले होते. तेच आता वर्ल्ड कपमध्ये झाले तर? अशी भीती क्रिकेटप्रेमींना वाटत आहे.

Maharashtra Politics । पडद्यामागं नेमकं काय घडतंय? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ‘वर्षा’वर तातडीने दाखल

परंतु देशात 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान पाऊस कमी होईल, अशा हवामान खात्याने (IMD) अंदाज वर्तवला आहे. परंतु, हवामान कधी बदलेल, कधी मुसळधार पाऊस होईल हे आताच सांगता येत नाही. बऱ्याचवेळा हवामान खात्याचे अंदाज तंतोतंत खरे ठरतात किंवा कधी फोल ठरतात. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये सामन्यांचं काय होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bus Accident । भीषण अपघात! बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू; अनेकजण गंभीर जखमी

Spread the love