Alibaug News । सध्या राज्यभर मुसळधार पाऊस होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. विजांच्या कडकडाटासह राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. यामध्ये कोकणातील अनेक जिल्ह्यांना परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. वीज पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्येच आता अलिबागमध्ये अंगावर वीज पडून एका पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शनिवारी सायंकाळच्या सुमाराची घटना घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अलिबाग तालुक्यातील दिवलांग या गावांमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला आहे.
रघुनाथ म्हात्रे आणि ऋषिकेश म्हात्रे असं या पिता पुत्राचे नाव आहे. ते शनिवारी सायंकाळच्या सुमारास शेततळ्यावर गेले होते. त्यावेळी अचानक दोघांच्या अंगावर वीज कोसळली आणि या घटनेमध्ये दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच त्यांना तेथील गावकऱ्यांनी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वी त्यांना मृत घोषित केले.
Pune Crime । धक्कादायक बातमी! पुण्यामधील ससून हॉस्पिटलच्या गेटवर सापडले दोन कोटींचे ड्रग्ज