Buldhana News । बुलढाणा : बुलढाण्यातील खामगाव (Khamgaon) तालुक्यात एक वेगळाच प्रकार घडला आहे. सुटाळ पुरा या गावात राहत असणाऱ्या अशोक सातव यांच्या घरात रविवारी रात्रीच्या दरम्यान अचानक एक व्यक्ती आली. विशेष म्हणजे या व्यक्तीची वेशभूषा हुबेहूब गजानन महाराजांसारखी (Gajanan Maharaj) होती. साक्षात गजानन महाराजच गावात प्रकटले, अशी बातमी संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. (Latets Marathi News)
Amol Kolhe । काहीही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडू नका, अमोल कोल्हेंना चिमुकल्याची भावनिक साद
हुबेहूब गजानन महाराजांसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीला पाहण्यासाठी बघ्यांची आणि भक्तांनी तुफान गर्दी केली. सातव यांच्या घराभोवती यात्रेचा स्वरूप प्राप्त झाले. आसपासच्या गावातही ही बातमी (Khamgaon Gajanan Maharaj Viral Video) पसरल्याने नागरिकांनी मिळेल ती गाडी पकडून या व्यक्तीला पाहण्यासाठी आले. जास्त गर्दी झाल्याने शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागलं.
Virat Kohli । वर्ल्ड कपपूर्वी किंग कोहलीचा धक्कादायक निर्णय, संघाची सोडली साथ
काही वेळानंतर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवता आलं. परंतु हा व्यक्ती कोण? कुठून आली? याबाबात कोणतीही माहिती मिळाली नाही. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अशा घटनांविरोधात कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून जोर धरू लागली आहे. परंतु हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर (Viral Video) प्रचंड व्हायरल होत आहे.