Mla Disqualification Case । बिग ब्रेकिंग! शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेवरील सुनावणीसंदर्भात समोर आली मोठी बातमी

Mla Disqualification Case

Mla Disqualification Case। शिवसेनेच्या (Shivsena) सत्तासंघर्षाचा पेच अजूनही सुटला नाही. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता या संदर्भात मोठी बातमी अपडेट समोर आली आहे. (Latest Marathi News)

Pune News । मोठी बातमी! पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला केलेल्या आरोपीला ३ महिन्यानंतर जामीन मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, याबाबत ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे.

Ajit Pawar । सर्वात मोठी बातमी! अजित पवार नाराज? मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर; नेमकं काय घडतंय?

दरम्यान, ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात धाव घेतली. ‘आमदार अपात्रतेचा मुद्दा सोडून राहुल नार्वेकर इतर विषयात वेळ घालवत आहेत’, असा आरोप ठाकरे गटाने केला होता. ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी सुप्रीम कोर्टात याबाबत प्रतिज्ञापत्र देखील दाखल केले आहे. मात्र आता सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे त्यामुळे आता या प्रकरणाचे पुढे काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Bus Accident । चालकाचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात! एकाचा जणाचा मृत्यू तर 25 जखमी

Spread the love