
मुंबई : जून ते ऑगस्ट दरम्यान राज्याभर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या राज्य सरकारनं ठेवल्या. त्यात शेतकऱ्यांचा विचार केला गेला नाही. सर्व सरकार गणपती उत्सवात दंग होत. आता गणपती उत्सव देखील संपलाय. मग आता शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार असा सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यसरकारला विचारलाय.
पुढे नाना पाटोले म्हणाले, सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. सामान्य नागरिक महागाईने त्रस्त आहे पण हे सरकार महागाईवर बोलायला सुद्धा तयार नाही. मात्र मलाई खाण्यासाठी गुवाहटीला गेले. महाराष्ट्राची बदमानी झाली. महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली. महाराष्ट्राच्या जनतेची झाली. त्याची या सरकारला चिंता नाही. हे सरकार फक्त राज्यातील गोरगरीब जनतेचा पैसा खाण्यासाठी काम करते. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा नाही. जिल्ह्याला पालकमंत्री द्यायचा नाही. असं बोलत नाना पाटोलेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
ड्रॅगन फ्रुट,किवीसारख्या विदेशी फळांची करा लागवड, ‘या’ योजनेअंतर्गत मिळेल अनुदान
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, महागाईचा विषय हा राज्यांचा आहे. महाराष्ट्र हे सगळ्यात किमती राज्य आहे. त्यामुळे सर्वात जास्त किमती राज्यात आहेत. डिझेल, पेट्रोल, खाद्यान्न या सगळ्या वस्तू देशात महाराष्ट्रात प्रचंड महाग आहेत. महागाईच्या विषयावर हे सरकार बोलायलाच तयार नाही, अशीही खोचक टीका पटोले यांनी केली.
Bjp: दिंडोशीमध्ये गणेश विसर्जनाच्यावेळी भाजपच्या दोन गटांमध्ये झाला तुफान राढा