Ajit Pawar Vs Sharad Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर भाजपसोबत हात मिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ केली घेतली. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. हे दोन गट वारंवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. दरम्यान या दोन्ही गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आपला दावा दाखवला. त्यानंतर आता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं याविषयीची आज पहिली सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे याकडे लक्ष लागलेले आहे.
अभिषेक मनू सिंघवी हे शरद पवार गटाकडून युक्तिवाद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शरद पवार गटाने सात ते नऊ हजार शपथपत्र दाखल केले आहेत. दुपारी तीन वाजता याबाबत सुनावणी होणार आहे. माहितीनुसार, जर निवडणूक चिन्ह गोठवलं तर पुढची रणनीती काय असेल याविषयी चर्चा करण्यासाठी काल शरद पवार गटाकडून दिल्ली कार्य समितीची एक बैठक देखील बोलवण्यात आली होती.
दरम्यान, अजित पवार गटापेक्षा शरद पवार गटाने दिलेल्या शपथपत्रांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाने मृत व्यक्तींची नावे शपथपत्र सादर केले असल्याचे देखील शरद पवार गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमकी आज याबाबत काय सुनावणी होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
Sanjay Raut । संजय राऊत यांना मोठा धक्का! धाकट्या भावाला नोटीस; नेमकं प्रकरण काय?