World Cup । वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात झाली आहे. यंदाचा विजेता कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 2011 साली टीम इंडियाने वर्ल्डकप सामना जिंकला होता, त्यानंतर संघाला ट्रॉफी जिंकता आली नाही. यंदा तरी संघाला ट्रॉफी मिळवता येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान,आज भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. चेन्नईमध्ये हे सामने रंगणार आहेत.
सामना सुरु होण्यापूर्वी टीम इंडियात मोठी फूट पडली आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे. टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. “सध्याचा संघ हा 2011 च्या संघानुसार एकसंध दिसत नाही, त्यांना सचिन तेंडुलकरसाठी ट्रॉफी जिंकायची होती. इतरांकडून त्याला सन्मान मिळत होता. परंतु, सध्याच्या संघाबद्दल मला असा विश्वास वाटत नाही. कोणाला विराट कोहलीसाठी हा वर्ल्डकप जिंकायचा आहे हे मला समजत नाही”, असे हरभजन सिंग म्हणाला आहे.
पुढे तो म्हणाला, “विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकायचा आहे, असे म्हटलं तर किती खेळाडू एकत्र येतील हे मला सांगता येणार नाही. विराटला स्वत:ला देशासाठी कप जिंकावा असे वाटत असेल तर तो स्वत:साठी हे यश बोनस म्हणून पकडेल, असे मला वाटत असल्याचे हरभजन सिंग म्हणाला. त्याच्या या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Rohit Pawar । “संपूर्ण महाराष्ट्र भिकारी होईल पण…” रोहित पवार यांचे मोठे वक्तव्य
असा असेल संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.