Satara Crime News । सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज अनेक मोठे मोठे गुन्हे घडत आहेत. सध्या देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माण तालुक्यातील आंधळी गावांमध्ये पती-पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्र वापरून खून केला असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अधिकचा तपास सुरू केला आहे. संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार यांची अज्ञातांनी धारदार शस्त्र वापरून हत्या केली आहे. (Satara Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, हे दोघेही पती-पत्नी शेतात पिकाला पाणी देण्यासाठी शनिवारी रात्री दहा नंतर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. मात्र याचवेळी अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या डोक्यावर, गळ्यावर वार करून या दांपत्याची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी त्याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या हत्येमागे नेमकं कारण काय आहे? हे अजून समोर आलेलं नाही. मात्र याबाबतचा अधिकचा तपास आता पोलिस यंत्रणा करत आहे. मात्र अतिशय निर्घृणपणे पती-पत्नीची हत्या करण्यात आल्यामुळे माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
Rohit Pawar । “संपूर्ण महाराष्ट्र भिकारी होईल पण…” रोहित पवार यांचे मोठे वक्तव्य