Supriya Sule । सोलापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल मिश्किलटिप्पणी केली आहे. (Supriya Sule)
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल खूप वाईट वाटतं. याआधी मुख्यमंत्रीपदाचे त्यांचं तिकीट कापलं त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री केले आणि त्यामध्ये देखील अजून एक उपमुख्यमंत्री वाढवला आहे. माझ्या भावाचा असा अपमान करू नका अशी मिश्किल टिपण्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
त्याचबरोबर यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्ही (भाजप) सरकार पाडण्यासाठी आणि आमदार विकत घेण्यासाठी जे पैसे खर्च करता ते पैसे किमान नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्यायला वापरा असे देखील त्या म्हणाल्या आहेत.