Ajit Pawar । अजित पवारांच्या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. शिवसेनेप्रमाणे (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर आता त्यांच्या जागी पार्थ पवारांची (Parth Pawar) नावाची चर्चा सुरु झाली आहे. (Latest Marathi News)
Shivsena । शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह ठाकरेंना मिळणार का? आज होणार महत्त्वपूर्ण सुनावणी
दरम्यान, अजित पवारांनी तब्बल 32 वर्षांनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद असल्याने कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला असावा असे बोललं जात आहे. अजित पवारांची दोन्ही मुले राजकारणात फार सक्रिय नव्हते. परंतु मागील काही दिवसांपासून ते सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
Washim crime । महाराष्ट्र हादरला! पेट्रोल ओतून झेडपी शिक्षकाला जिवंत जाळलं, नेमकं कारण काय?
पार्थ पवार यांना पुणे जिल्हा बँकेचे संचालक पद मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील देशातील पहिल्या क्रमांकाची बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.