Accident On Samriddhi Highway । समृद्धी महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. जेव्हापासून समृद्धी महामार्ग चालू झाला आहे तेव्हापासून दररोज समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळत आहेत, या ठिकाणी अपघात वाहनाचे टायर फुटून, जंगली जनावर आडवे येऊन, त्याचबरोबर चालकाचे नियंत्रण सुटून असे अपघात घडतच आहेत. सध्या देखील या महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 20 ते 22 जण जखमी झाले आहेत. (Accident On Samriddhi Highway )
Satara Accident । पुणे–बंगळूर महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 3 जागीच ठार
याबाबत अधिकची माहिती अशी की, संभाजीनगरच्या वैजापूर जवळील आगर सायगाव या ठिकाणी एक ट्रक थांबलेला होता त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव खाजगी बसणे या ट्रकला जोरदार धडक दिली आणि ही धडक इतकी भीषण होती की बस दूरवर जाऊन पलटी झाली आणि या अपघातात बसमधील जवळपास 12 प्रवासी जागीच ठार झाले तर 20 ते 22 प्रवासी जखमी आहेत.
Maratha Reservation । “छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे एकाच बाजारातले,” मनोज जरांगेंची जहरी टीका
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि तेथील स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.