
Saath Nibhana Saathiya । सध्या मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साथ निभाना साथिया या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या जेष्ठ अभिनेत्रीचे निधन झाले आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. साथ निभाना साथिया मालिकेतील अभिनेत्री अपर्णा काणेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. (Aparna Kanekar passed away)
अपर्णा काणेकर (Aparna Kanekar) यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहते त्यांना श्रद्धांजली देत आहेत. सध्या सगळीकडे अपर्णा काणेकर यांच्या निधनाची चर्चा रंगली आहे. अपर्णा काणेकर यांनी साथ निभाना साथिया या मालिकेमध्ये जानकी बा मोदी ही भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना एक वेगळीच ओळख मिळाली होती.
अपर्णा काणेकर यांच्या निधनाबाबत माहिती मालिकेतील अभिनेत्री लवली ससान हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहे. लवली ससान हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम वर अपर्णा काणेकर यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केल्यामुळे त्यांच्या निधनाची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत दुःख देखील व्यक्त केले आहे.
Accident News । ब्रेकिंग न्यूज! भाजप खासदाराच्या गाडीचा भीषण अपघात